गदिमा नवनित
  • जिवासंगे जन्मे मृत्यु, जोड जन्मजात
    दिसें भासतें तें सारें विश्व नाशवंत
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतगोपाल (संगीत:यशवंत देव) | Geetgopal (Yashwant Deo)
  • पं.महादेवशास्त्री जोशी:
    गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार ! गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.


    सुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल

    निवेदन: आनंद माडगूळकर,शैला मुकंद,करुणा देव

    निर्मिती:आनंद माडगूळकर
    निर्मिती सहकार्य: श्रीकांत कुलकर्णी,राजेंद्र कुलकर्णी
    वाद्यवृंद संचालन:अरविंद हसबनीस
    वाद्यवृंद सहायक:आनंद गोडसे
    ध्वनिमुद्रण:अतुल ताम्हणकर,संजय दाबके

    Cds Available On फाउंटन म्युझिक कंपनी | Fountain Music Company
  • Box-C-42
 
  • पाने: 1 | 2


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.ल.देशपांडे:
    महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.