आमच्या बद्दल | About Us
 • श्री सुमित्र माडगूळकर | Sumitra Madgulkar :
 • Sumitr Madgulkar १) गदिमांचे नातू व लेखक आहेत,व्यवसायाने Software Engineer आहेत,१९९८ साली गदिमांच्या साहित्य-चित्रपटांवर आधारित इंटरनेटवर ''मराठी साहित्यातील'' पहिली Multimedia वेबसाईट गदिमा.कॉम (gadima.com ) त्यांनी तयार केलेली आहे.मराठी भाषा इंटरनेटवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
  २) ''गदिमा साहित्य कला अकादमी'' या संस्थेच्या माध्यमातून गदिमांचे स्मारक ते पुण्यात उभारत आहेत व त्यांचे साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी इंटरनेट,पेनड्राईव्ह,डिव्हीडी सारख्या माध्यमातून त्यांनी गदिमांचे साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे.
  ३) दै.लोकमत,दै.देशोन्नती सारख्या अनेक लोकप्रिय वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्ति व अनेक मराठी वेबसाईटना त्यांनी तंत्रज्ञान सहाय्य दिलेले आहे.
  ४) दूरदर्शन,ई टिव्ही मराठी,झी मराठी,IBN लोकमत सारख्या अनेक वाहिन्यांवर मराठी बातम्या,मानाचा मुजरा,नक्षत्राचे देणे अशा कार्यक्रमात सहभाग.सोनी म्युझिक च्या सहकार्याने 'जोगिया' या मराठी म्युझिक अल्बमची निर्मिती त्यांनी केली होती.सकाळ,लोकमत,महाराष्ट्र टाईम्स सारख्या अनेक वृत्तपत्रातून तसेच लोकप्रिय दिवाळी अंकातून व सोशल मीडियातून त्यांचे लिखाण चालू असते.
  ५) अॅखन्डरॉईड मोबाईलवर ''गीतरामायण अॅाप'' चे निर्माते,फेसबुकवर गदिमा व गीतरामायण पेज ची निर्मिती,तसेच आठवणीतील गाणी,झगमग.नेट सारख्या वेबसाईटवरुन त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. • प्राजक्ता सुमित्र माडगूळकर | Prajakta Sumitra Madgulkar :
 • Prajakta Madgulkar गदिमांच्या नातसून असून,व्यावसायाने अकाउंटंट व काऊंसलर आहेत,दै.सकाळ सारख्या अनेक वृत्तपत्रांतून लिखाण,गदिमांचे प्रकाशित-अप्रकाशित साहित्य नव्या माध्यमात नेण्यासाठी पुढाकार.सल्लागार
 • कै.श्रीधर माडगूळकर
  शीतल माडगूळकर
  Shridhar Madgulkar
  Sheetal Madgulkar
  गदिमांचे ज्येष्ठ पुत्र व लेखक.गदिमा प्रतिष्ठान सारख्या अनेक संस्थांवर कार्यरत होते.
  गदिमांच्या स्नुषा असून,प्रकाशिका आहेत,गदिमांच्या अनेक पुस्तकांचे त्यांनी संकलन व प्रकाशन केले आहे. • संपर्क | Contact :
 • श्री .सुमित्र माडगूळकर
  Panchawati Bungalow,11 Pune Mumbai Road,Wakdewadi, Pune, Maharashtra 411003
  Email:sumitr.madgulkar@gmail.com

गदिमा गौरव | Special Quotes
 • बा.भ.बोरकर
  वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.