गदिमा नवनित
  • पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांचे विनोदी किस्से | Funny Articles
  •  
  • Box-C-33
  • पु.ल.देशपांडे व गदिमा पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यावरुन प्रभातफेरीला निघाले होते,रात्रभर एका चित्रपटाचे चित्रीकरण आटपून मंडळी चालायला निघाली होती,तितक्यात रस्त्यात महानगरपालिकेचे दिवे बंद झाले आणि काय गंमत गदिमांना गीत सुचले "विझले रत्नदीप नगरात,आता जागे व्हा यदुनाथ".
  • पुण्याला 'बालगंधर्व' थिएटर उभे राहत होते,गोपाल देउसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणार्‍या चार ओळी पाहिजे होत्या. पंचवटी गाठली. माडगूळकरांना म्हणालो, "स्वामी, चार ओळी हव्या आहेत ....बालगंधर्वाच्या पोट्रेटपाशी".मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले ,"असा बालगंधर्व आता न होणे."
  • एकदा अण्णा.. म्हणजे ग.दि.मा आणि त्यांचे काही मित्र.. मधुकर पाठक वगेरे बोलत असताना एक ब्रम्हभट्ट नावाचा उत्तर प्रदेशातून कवी ग.दि.मा कुठे आहेत म्हणुन विचारत आला.. कहाँ है वो अण्णा?.. बाकीचे भडकले.. की असा काय बोलतो हा?..
  • गदिमा व पुल ही नावे माहित नाहित असा मराठी माणूस सापडणे कठीण!,पण त्यांच्या आयुष्यातही काही गमतीशीर प्रसंग घडतात त्यापैकीच एक.२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधले,त्याच्या उदघाटन प्रसंगी आम्हा माडगूळकर कुटुंबियांना मोठे आग्रहाचे निमंत्रण होते,त्याच वेळी शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा.
  • महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा' अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर....
  • तुम्ही अनिल कपूर व श्रीदेवीचा मि.इंडिया चित्रपट पाहिला असेलच,त्यात अनिल कपूर हातात गॅझेट घालून अदृष्य होत असतो व मोगॅंबो समवेत गमती-जमती करत असतो,आता गदिमा जर अचानक अदृष्य झाले तर काय होईल,गदिमांचा एक गमतीदार किस्सा!.
  • गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात 'ए.क.कवडा' या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती,त्या वेळच्या प्रसंगानूसार किंव्हा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते.


गदिमा गौरव | Special Quotes
  • यशवंतराव चव्हाण
    गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'