गदिमा नवनित
  • चंदनी चितेत जळाला चंदन,
    सुगंधे भरुन मर्त्यलोक!.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांच्या गाणी-आठवणी | Gaani Aathvani
  •  
  • Box-C-31
  • गदिमांचे स्नेही भाऊसाहेब नेवाळकर यांचे सुपुत्र व 'महाराष्ट्र मिनरल्स कॉर्पोरेशनचे' श्री.अनिल नेवाळकर यांच्या लग्नासाठी गदिमांनी खास लिहिलेली ही मंगलाष्टके,आज ४५ वर्षानंतरसुद्धा तितकीच ताजी-तवानी व अगदी तुमच्या भावी लग्नात वापरु शकता इतकी अप्रतिम...त्याची आठवण सांगत आहेत श्री.अनिल नेवाळकर.......
  • गदिमांचे एक सुंदर गीत,आपल्या प्रत्येकात एक कुरुप पिल्लू दडलेले आहे,आपण डावलले जातो आहोत,आपल्यातल्या टॅलेंटला वाव मिळत नाहीये,कोणीही सोमे गोमे येतात आणि आपल्या पुढे जातात,आपली कदर कोणी करत नाहीये..ही भावना कधी न आपल्या आयुष्यात कुरुप बदकाच्या पिल्लाच्या रुपाने आपल्या भावतरंगातून मान नक्कीच वर काढते व गदिमांनी हे गाणे फक्त आपल्यासाठीच लिहून ठेवले आहे व आपल्यातला राजहंस एक न एक दिवस जगापुढे येईल याची आशा आपल्या मनाला उभारी देत राहते.
  • निसर्गसंपन्न कोकण,नारळ-काजू-आंबा-फणसांच्या दाट बागा-वाडया,सुंदर समुद्र किनारे...घरोघरी रंगणार्‍या कोकणच्या भूतांच्या गोष्टी..धडकी भरवणारा प्रचंड पाऊस...खवय्यांसाठी समृद्ध जलसंपत्ती...अजूनही काळजात शहाळी भरलेली कोकणची साधी भोळी माणसं (भूतं सोडून !)...वरुन न दिसणारी गरीबी...कोकणात नारळ लोकांच्या डोक्यात कसे पडत नाहीत हा पुण्या-मुंबईच्या लोकांना पडलेला यक्षप्रश्न!.... कोकणात काय नाही?...
  • पुणे म्हंटले की ज्या मोजक्या गोष्टी समोर येतात त्यात शनिवारवाडा हा असतोच,रथसप्तमीच्या मुहूर्तावर पुण्यात पेशवे मंडळींनी मोठ्या थाटामाटात या वाड्याची वास्तुशांत केली,असे म्हणतात की या वाड्याची पाहणी झाली तो शनिवार होता,पायाभरणी झाली तोही शनिवार होता व वास्तुशांत व गृहप्रवेश झाला तोही शनिवार!,त्यामूळे या वाड्याचे नावे 'शनिवार वाडा' असे ठेवण्यात आले.
  • काही मृत्यू मनाला चटला लावून जातात,मा.मीनाताई ठाकरे,शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे,विलासरावजी देशमूख,प्रमोदजी महाजन व आता गोपीनाथजी मुंडे...
  • १९७० साल,पुण्यात गणेशखिड रोडवरच्या कस्तुरबा मंगल कार्यालयात जणू साक्षात् दुसरे मराठी साहित्य संमेनचच भरले होते. प्रसंगच तसा होता. गदिमांची द्वितीय कन्या कल्पलताचा विवाह ‘हंस’, ‘मोहिनी’,‘नवल’ या मासिकाचे देखणे, सुविद्य संपादक आनंद अंतरकरांशी साजरा होत होता.
  • पुण्याला 'बालगंधर्व' थिएटर उभे राहत होते,गोपाल देउसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणार्‍या चार ओळी पाहिजे होत्या. पंचवटी गाठली. माडगूळकरांना म्हणालो, "स्वामी, चार ओळी हव्या आहेत ....बालगंधर्वाच्या पोट्रेटपाशी".मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले ,"असा बालगंधर्व आता न होणे."
  • महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा' अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर....
  • तुम्ही तंबाखू किंव्हा चक्क पालीवर गाणे लिहू शकाल?,शिरशीरी आली नं?,आता गदिमांचेच बघा 'या चिमण्यांनो, परत फिरा रे' गाण्यात 'चुकचूक करीते पाल उगाच, चिंता मज लागल्या' किती चपखल पणे शब्द बसला!,पाल ही बिचारी धन्य धन्य झाली असेल.
  • आज विद्याताई व गदिमा आनंदात होते,त्यांच्या मोठया लाडक्या लेकीला 'वर्षा'ला एक चांगले स्थळ सांगून आले होते,गदिमांच्या चाहते परिवारातले राजाभाऊ सदार्वते (पुण्यात यांचे सदार्वते राममंदिर प्रसिध्द आहे) यांनी उद्योगपती मल्हार सदाशिव (म.स) तथा बाबुरावजी पारखे यांच्या ज्येष्ठ चिरंजीव सुधाकर पारखे यांचे स्थळ सुचवीले होते.
  • १२ जुलै १९६२,पुण्यात हाहाकार माजला होता,जो तो ओरडत पळत होता 'पाणी आलं ..पाणी आलं...',गोष्टच तशी होती पानशेत धरणाला मोठी भेग पडली होती,भारतीय जवानांनी अथक परिश्रम करुन वाळूची हजारो पोती रात्रभर रचली होती व रात्रीच फुटणारे धरण सकाळ पर्यंत थोपवून धरल होतं.
  • प्रतिभावंतांची प्रतिभा कधी,कुठे व केव्हा जागृत होईल हे सांगता येत नाही,मयतीच्या प्रसंगांतून एक अजरामर गाणे होऊ शकते का तर याचे उत्तर हो आहे!,'बुगडी माझी सांडली गं' च्या निमिर्ती ची रंजक कथा...
  • गदिमांची बैठक जमली होती.पांढर्‍याशुभ्र गाद्या,लोड तक्के सज्ज होते.दोन दिग्गज कलाकार कवी ग.दि.माडगूळकर व संगीतकार पु.ल.देशपांडे "देवबाप्पा" चित्रपटाच्या कामाला लागले होते,पण काम सोडून भलतीच मस्ती चालली होती....


गदिमा गौरव | Special Quotes
  • ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
    गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....