गदिमा नवनित
  • पळून गेलेल्या काळाच्या कानात,
    माझ्या गीतांची भिकबाळी डोलते आहे.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांचे किस्से | General Articles
  •  
  • Box-C-36
  • गदिमांचे स्नेही भाऊसाहेब नेवाळकर यांचे सुपुत्र व 'महाराष्ट्र मिनरल्स कॉर्पोरेशनचे' श्री.अनिल नेवाळकर यांच्या लग्नासाठी गदिमांनी खास लिहिलेली ही मंगलाष्टके,आज ४५ वर्षानंतरसुद्धा तितकीच ताजी-तवानी व अगदी तुमच्या भावी लग्नात वापरु शकता इतकी अप्रतिम...त्याची आठवण सांगत आहेत श्री.अनिल नेवाळकर.......
  • निसर्गसंपन्न कोकण,नारळ-काजू-आंबा-फणसांच्या दाट बागा-वाडया,सुंदर समुद्र किनारे...घरोघरी रंगणार्‍या कोकणच्या भूतांच्या गोष्टी..धडकी भरवणारा प्रचंड पाऊस...खवय्यांसाठी समृद्ध जलसंपत्ती...अजूनही काळजात शहाळी भरलेली कोकणची साधी भोळी माणसं (भूतं सोडून !)...वरुन न दिसणारी गरीबी...कोकणात नारळ लोकांच्या डोक्यात कसे पडत नाहीत हा पुण्या-मुंबईच्या लोकांना पडलेला यक्षप्रश्न!.... कोकणात काय नाही?...
  • आजही गदिमांच्या 'पंचवटी' जवळच्या 'यवन दर्ग्या' बाहेर रामाची-गीतरामायणाची पोस्टर मोठ्या आनंदाने लावली जातात,पुण्यातील मुस्लिम संघटना एकत्र येऊन पुण्याच्या कलेक्टर ला निवेदन देतात की गदिमांचे स्मारक लवकर व्हावे,बाबरी मशिद प्रकरणानंतर निर्माण झालेली कटुता येथे कुठेच दिसत नाही,मराठी भाषेचे जाणकार असलेल्या मुस्लिम बांधवांना असलेले गदिमांबद्दलचे प्रेम आपण समजू शकतो पण ज्याला गदिमांच्या साहित्याबद्दल कदाचित माहितीपण नसावी अश्या मुस्लिम बांधवांना गदिमांबद्दल इतके प्रेम - आदर का असावा की त्यांनी चक्क रामाची पोस्टर लावावित,असे काय घडले होते?.
  • लहानपणी मी पाटीवर श्री गजानन प्रसन्न ही अक्षरं गिरवत होते. मोठेपणी तेच दोन्ही शब्द माझ्या जीवनात एवढी प्रसन्नता व काव्य घेऊन येतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
  • काही मृत्यू मनाला चटला लावून जातात,मा.मीनाताई ठाकरे,शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे,विलासरावजी देशमूख,प्रमोदजी महाजन व आता गोपीनाथजी मुंडे...
  • पु.ल.देशपांडे व गदिमा पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यावरुन प्रभातफेरीला निघाले होते,रात्रभर एका चित्रपटाचे चित्रीकरण आटपून मंडळी चालायला निघाली होती,तितक्यात रस्त्यात महानगरपालिकेचे दिवे बंद झाले आणि काय गंमत गदिमांना गीत सुचले "विझले रत्नदीप नगरात,आता जागे व्हा यदुनाथ".
  • माझ्या कळतेपणापासून गेली जवळ जवळ पन्नास वर्षे माडगूळला जाण्याची कल्पना निघाली की सर्व प्रथम कोणत्या मार्गाने जायचे याची चर्चा घरात जवळ जवळ जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चालायची. काहींचे मत पडायचे की कोरेगाव मार्गाने आटपाडीपर्यंत जावे, तर काहींचे कर्‍हा-वीटा मार्गाने! कुठलाही मोठा घाट नसलेल्या सोलापूर रोडने इंदापूर आणि तिथून अकलूज सांगोला मार्गे थेट माडगूळलाच जावे, तर काहींचे म्हणणे फलटण-म्हसवड मार्ग जवळचा असल्याने त्याच मार्गाने जावे असे असायचे. मला स्वत:ला मात्र कुर्डुवाडीवरून बार्शीलाईट रेल्वेने सांगोला आणि तेथून मोटारने माडगूळला जाणेच खूप आवडायचे.
  • मग तुम्ही आमच्या कोल्हापूरचेच आहात म्हना की !’’ आपल्या निळ्या कोचावर ऐसपैस बसत गदिमा खास कोल्हापुरी हेल काढून म्हणाले आणि समोरच्या खुर्चीतील तरुण आश्चर्याने त्यांच्याकडे नुसता बघतच राहिला.‘गीतरामायण’कार आधुनिक वाल्मिकी गदिमांचे आता अस्सल कोल्हापुरी माणसात रूपांतर झाले होते. वय आणि अनुभवामुळे चेहर्‍यावर आलेला गंभीर प्रौढपणाचा मुखवटा ‘कोल्हापूर’ या जादूई नावाने केव्हाच गळून गेला होता. एव्हाना हातातल्या अडकित्याने रोठा सुपारीचे छान कतरी सुपारीत रूपांतर केले होते.
  • पुण्याला 'बालगंधर्व' थिएटर उभे राहत होते,गोपाल देउसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणार्‍या चार ओळी पाहिजे होत्या. पंचवटी गाठली. माडगूळकरांना म्हणालो, "स्वामी, चार ओळी हव्या आहेत ....बालगंधर्वाच्या पोट्रेटपाशी".मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले ,"असा बालगंधर्व आता न होणे."
  • गदिमांनी आपली पुण्यातली टिळकरोडवरची जागा ज्याची आज करोडो रुपयात किंमत असेल सुधीर फडक्यांना एका क्षणात भेट देऊन टाकली,आज सख्या भावा-बहिणी साठी सुद्धा कोणी काही करत नाही आपल्या मित्रासाठी कोण करेल?.
  • महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा' अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर....
  • "पंचवटी",पुणे अर्थात गदिमांच्या बंगल्यात नातेवाईक व गदिमांच्या चाहत्यांचा स्नेहमेळा जमला होता,कारण तसेच होते आज 'लोकमान्य टिळक प्रतिष्ठान' व 'पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती समिती' मार्फत गदिमांच्या वास्तूवर निलफलक लावण्यात येणार होता.या संस्थेमार्फत पुण्यातील नामवंतांच्या घरावर असे निलफलक लावण्यात येतात.
  • कोल्हापूरच्या सोळंकूरकर मास्तरांचा संगीत मेळा त्याकाळात खूप प्रसिध्द होता,मेळ्यात त्याकाळात गाणार्‍या गुणवान मुलांची नावे होती सुधीर फडके,राम गबाले,आप्पासाहेब भोगावकर!.मुंबईत संगीत क्षेत्रात धडपडणारे पण कोल्हापूरला या मुलांसमोर भेट देताना ज्यांची 'मुंबईचे नामवंत भावगीत गायक' अशी ओळख करुन दिली जात असे ते पु.ल.देशपांडे हेही या मेळ्याला नामवंत पाहुणे म्हणून भेट देत असत!.
  • उद्यानात लेकीला घेऊन गेले तर खुद्द गदिमा आणि पुलंचा सहवास लाभलेले एक आजोबा भेटले. आजच्या युगात नातीसुद्धा दुर्मिळ होत असताना वडिलांच्या इच्छेचा मान ठेवणारे किती भेटतील?
  • पंचवटी च्या व्हरांडयात गदिमा त्यांच्या सुप्रसिद्ध निळ्या कोचावर बसले होते,फाटकातून दोन व्यक्ति आत शिरल्या,त्यातले एक तेजपुंज व्यक्तिमत्व पांढरा परिवेश,धारधार नाक,गदिमांचे त्यावेळचे स्विय सहाय्यक बाबा पाठक स्वागताला पुढे झाले,'या गुरुदत्तजी!'.
  • गदिमांना जन्मताच मृत घोषित करण्यात आले होते,लहान मूल असल्यामुळे दफनासाठी खड्डाही खोदण्यात आला,पण सर्वात वर बसलेल्या पटकथाकाराची 'पटकथा' सूरु होण्याआधीच कशी संपेल!,गदिमांच्या जन्माची रंजक कथा.....
  • पुण्याची 'फिल्म ऐंड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया',भारत सरकारची एक नामांकीत संस्था, जया भादुरी,शबाना आजमी,शत्रुघ्न सिन्हा,टॉम अल्टर, नसीरूद्दीन शाह,ओमपुरी सारखे दिग्गज कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीला देणारी.आजही देश-विदेशातून अनेक विद्यार्थी येथे चित्रपट सृष्टीसंबंधी अभ्यासक्रम शिकायला येतात.


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.