एकदा अण्णा.. म्हणजे ग.दि.मा आणि त्यांचे काही मित्र.. मधुकर पाठक वगेरे बोलत असताना एक ब्रम्हभट्ट नावाचा उत्तर प्रदेशातून कवी ग.दि.मा कुठे आहेत म्हणुन विचारत आला.. कहाँ है वो अण्णा?.. बाकीचे भडकले.. की असा काय बोलतो हा?..
त्यांनी विचारलं की तू कोणाशी बोलतो आहेस हे तुला माहित आहे
का?.. तो म्हणाला की हाँ.. मालूम है.. मराठी के बहोत बडे कवी.. ग.दि.मा से..
मधुकर पाठक म्हणाले की मग अरे तुरे काय करतोस?.. यावर अण्णा म्हणाले की असूदे.. काय नाव आपलं?.. तो म्हणाला की ब्रम्हभट.. ते म्हणाले.. की का मला शोधत आलास बाबा?.. तुझं काही काम आहे का?.. यावर तो म्ह्नाला की अण्णा मैने सुना है की आप बहोत शीघ्रकवी है.. मेरी एक कविता हैं उसका आप अभी के अभी मराठी मे अनुवाद कीजिये, तो मैं मानू..
यावर बाकी सगळे भडकले.. की काय डेरींग ह्या माणसाची.. अण्णांना असं सांगू शकतो म्हणजे काय?.. पण अण्णांचा स्वभाव कोणाला कधीच न दुखावण्याचा.. त्यामुळे त्यांनी त्या कवीला सांगितलं की सांग तुझी कविता.. यावर तो कवी खूप खूष झाला आणि त्यांनी त्याची कविता सांगितली..
तो म्हणाला -
अर्ज किया है -
रातभर रहियो.. सबेरे चले जयियो..
रातभर रहियो.. सबेरे चले जयियो...
मिलनेवालों के साथ क्या काम है जलने वालों का?...
यावर अण्णा खूप खूष झाले.. ते म्हणाले बहोत खूब.. क्या लिखते हो आप?... यावर ब्रम्हभट्ट म्हणाला .. अण्णा अब इसका मराठी मे रुपांतर करो.. बाकी सगळे अण्णां कडे बघायला लागले.. की आता ते काय करतात?.. पण अण्णा डोळे मिटून शांतपणे बसले.. आणि ५ मिनिटांनंतर डोळे उघडून म्हणाले.. की घ्या लिहून... यावर सगळे अवाक्..
त्या कवीच्या कवितेचा अण्णांनी
मराठी अनुवाद असा केला होता -
अण्णा म्हणाले -
रातभर रहावा.. झुंजूरका तुम्ही जावा..
रातभर रहावा.. झुंजूरका तुम्ही जावा..
शेजेशी समई मी लावू कशाला?..
जुळत्या जिवांशी जळती कशाला?.. इश्काचा मजा तुमी घ्यावा... रातभर रहावा ....
यावर त्या ब्रम्हभट्ट नावाच्या कवीने अण्णांसमोर लोटांगण घातलं असेल... असे होते अण्णा म्हणजेच आपले महाकवी गजानन दिगंबर माडगूळकर...
गदिमा गौरव | Special Quotes
यशवंतराव चव्हाण
गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'