गदिमा नवनित
  • या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
    पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांच्या आवाजात कविता,व्याख्यान | Poems & Speech Of Gadima
  • गदिमांच्या आवाजात त्यांच्या कविता व त्यांचे भाषण ऐकणे हा दुर्मिळ योग,जोगिया,जत्रेच्या रात्री व पूजास्थान या तीन कविता ऐका गदिमांच्याच आवाजात,तसेच पेण येणे गणेशोत्सव मंडळात गदिमांनी केलेले एक तासाचे दुर्मिळ भाषण मी कवी कसा झालो?,मराठी भाषा,आपली मराठी संस्कृती,संस्कार या पासून ते गदिमांच्यातला कवी कसा घडत गेला हे ऐका गदिमांच्या या सुंदर व्याख्यानातून.

    गदिमांच्या पत्नि विद्याताई यांचा आवाज सुंदर होता,गदिमा-सुधीर फडके यांचे पहिले रेकॉर्ड झालेले गाणे विदयाताईंनी गायले होते.पुढे गदिमांसाठी त्यांनी आपल्या या गानकलेचा त्याग केला व गदिमांची गृहिणी-सखी-सचीव हीच भूमिका शेवटपर्यंत निभावली.गदिमा स्व:ता म्हणतात हे यश माझे नाही तूझे आहे,विदयाताईंच्या आवाजातले हे एक दुर्मिळ गाणे छुमछुम छुमछुम नाच मोरा.
  • Box-C-7
  • जत्रेच्या रात्री - गदिमांच्या आवाजात
    Jatrechya Ratri - Voice Of Ga.Di.Madgulkar

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • अल्बम: गदिमांच्या आवाजात      Album: Gadima Voice





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)

  • दुणावून लय स्वरांत चढत्या शिरते सुरते गडी,
    सुरावट भाषेहुन रांगडी.
    डफदिमड्यांची गरम जाहली कडाडुनी कातडी,
    पुढे ये सोंगाड्या सौंगडी.
    शीळ चढवुनी केली त्याने कल्लोळावर कडी,
    उडवीली सुरत्यांची वावडी.
    झरझरा उतरली वाद्यांची तों लय,
    पोंचला शिगेला श्रोत्यांचा विस्मय.
    वाजले चाळ अन् तालावर थक् थय,
    कंबर लचकत येइ छोकरी छेलाटी गुलछडी
    अंगलट भुवईसम वाकडी.
    झडल्या टाळ्या,शिट्या,आरोळ्या, वर चवल्यांच्या झडी,
    स्वीकारी मुजर्‍्यासह फांकडी.
    हिरवे पातळ,हिरवी चोळी,वरी चमकते खडी,
    छातीवर मोत्यांची दुल्लडी.
    नथणीखाली हलूं लागली अधरांची लालडी,
    वाहिली रसरंगा दोथडी.
    कुणि गालावरच्या खळींत बसले दडून,
    कुणि ओठ चाविले आपुलेच कडकडून,
    कुणि पदरामागिल करवंदे घे खुडून.
    खमिजावरि तों कुणीं ठसविली तिच्या चोळीची खडी
    कुणीतरी कातरली कांकडी.
    स्वप्न समोरी, स्वप्न अंतरी,रतले,भुलले गडी,
    चालली घडीमागुती घडी.
    नाहिं उमगलें घुसल्या केव्हां जत्रेच्या झुंबडी,
    बाजुची कनात हो उघडी.
    मधेंच आली मधीं चांदणी शुक्राची चोंबडी,
    रेकली वेड्यापरि कोंबडी.
    जाहले पुसट तो वेळूंवरचे दिवे,
    ती इष्कबाजिची ज्योतही मालवे.
    जागींच राहिले बसुन जनांचे थवे,
    कशी संपली रात कळेना इतक्यांतच तोकडी,
    रिचवितां ताडीच्या कावडी.


गदिमा गौरव | Special Quotes
  • यशवंतराव चव्हाण
    गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'
संबंधीत गाणी | Related Marathi Songs