शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेले 'लाखाची गोष्ट' या गदिमांच्या चित्रपटाचे छापिल पोस्टर!
Lakhachi Goshta Poster By Shivsena Chief Shri Balasaheb Thackeray
सुमित्र माडगूळकर | Sumitra Madgulkar
या पोस्टर मध्ये डावीकडे कुत्रे मंडळींच्या गोतावळ्यात 'गदिमा' तर उजवीकडे 'राजा परांजपे',डावीकडे सर्वात खाली बाळासाहेबांची सही,दुर्मिळ असे पोस्टर.
'गजराज चित्र' ही 'गजानन दिगंबर माडगूळकर' मधला 'गज' व राजा परांजपे मधला 'राज' अशी 'गजराज' - गदिमा-राजा परांजपे यांनी काढलेली चित्रपट संस्था होती.
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.