गदिमा नवनित
  • अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत
    सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
मराठी युनिकोड फॉन्ट
  • बुगडी माझी सांडली गं
  • Bugadi Mazi Sandli Ga
  • सुमित्र माडगूळकर | Sumitra Madgulkar


  •      

    प्रतिभावंतांची प्रतिभा कधी,कुठे व केव्हा जागृत होईल हे सांगता येत नाही,मयतीच्या प्रसंगांतून एक अजरामर गाणे होऊ शकते का तर याचे उत्तर हो आहे!,'बुगडी माझी सांडली गं' च्या निमिर्ती ची रंजक कथा...

    'सांगत्ये ऐका' हा गदिमांचा खूप गाजलेला चित्रपट,२९ मे १९५९ रोजी पुण्याच्या 'विजयानंद' चित्रपटगृहात हा चित्रपट झळकला

    आणि त्याने मराठी, भारतीय,जागतिक चित्रपटसृष्टीत नवा इतिहास-विक्रमही घडवला.हा चित्रपट सलग ५ वर्षे चालला,चित्रपटात वग,द्वंद्व गीत,भूपाळी,स्त्री गीत आणि लावण्या अश्या विविध गीत प्रकारांचा समावेश होता.चित्रपटाचे संगीतकार होते वंसत पवार तर त्यांचे सहाय्यक म्हणून राम कदम काम करीत होते.

    या चित्रपटाचे शुटींग पुण्याच्या प्रभात चित्रनगरीत चित्रित झाले (Film Institute,Pune),केवळ ३ महिन्यात हे पूर्ण झाले,गदिमांनी चित्रपटासाठी झकास 'बुगडी माझी सांडली गं' लावणी लिहून दिली पण संगीतकार वसंत पवार यांना काही केल्या या गाण्याला चाल सुचेना,सतत त्यांच्या व सहाय्यक राम कदमांच्या डोक्यात विविध चाली घोळत होत्या पण मनासारखी चाल काही होईना.

    एक दिवस राम कदम त्यांच्या घरी होते,शेजारी एका घरात कोणाचे तरी निधन झाले,मोठ्याने रडारड सूरु झाली,ग्रामीण भागात मोठ्याने हाका घालीत रडण्याची साधारण पद्धत असते.राम कदम ते ऐकत होते,घरातली एक महिला मोठ्याने मयताला साद घालत होती 'असा कसा माझा बाबा गेला गं.....' 'असा कसा माझा बाबा गेला गं.....'

    आणि काय गंमत या रडण्याच्या तालातून राम कदमांना या गाण्याची चाल सुचली 'बुगडी माझी सांडली गं....' व गेली ५५ वर्षे गाजत असलेल्या झकास लावणीचा जन्म झाला.

    मेरा साया या हिंदी चित्रपटात गाजलेले गीत आहे 'झुमका गीरा रे' हा चित्रपट १९६६ साली प्रदर्शीत झाला तर 'बुगडी माझी सांडली गं' वाला सांगत्ये ऐका हा १९५९ साली त्यामुळे 'झुमका गीरा रे' चा 'बुगडी माझी सांडली गं' हा अनुवाद आहे हा गैरसमज आहे,उलटे असू शकते.