गदिमा नवनित
  • या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
    पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती.
मराठी युनिकोड फॉन्ट
साई दरबार (सी.रामचंद्र) | Sai Darbar (C.Ramchandra)
  • गदिमांनी साईबाबांच्या गौरवार्थ लिहिलेली ही 'साई दरबार' गौरव गीते,गंमत म्हणजे गदिमांनी ही गीते 'राम गुलाम' या टोपण नावाने लिहिली होती,यातील 'काकड आरती करितो साईनाथ देवा' हे गीत शिर्डीच्या साई मंदिरात सकाळी काकड आरती म्हणून नित्यनियमाने गायले जाते,तसेच 'शिर्डी पंढरपूर माझे' ही गीत पण मंदिरात सारखे गायले जाते.

    या गीतांचे संगीतकार आहेत सी.रामचंद्र

  • Box-C-44
  • काकड आरती करितो साईनाथ देवा
    Kakad Aarti Karito Sainath Deva

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर (राम गुलाम या टोपण नावाने)      Lyricist: Ga.Di.Madgulkar (As Ram Gulam)
  • संगीतकार: सी.रामचंद्र      Music Composer: C.Ramchandra
  • गायक: व्ही.जी.भाटकर      Singer: V G Bhatkar
  • अल्बम: साई दरबार      Album: SaiDarbar





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)

  • काकड आरती करितो साईनाथ देवा ।
    चिन्मयरूप दाखवी घेउनी बालक-लघुसेवा ॥
    काम क्रोध मद मत्सर आटुनी काकडा केला।
    वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला।।
    साइनाथ गुरुभक्तिज्वलने तो मी पेटविला ।
    तदवृत्ति जाळुनी गुरुने प्रकाश पाडियला।
    द्वैत-तमा नासूनी मिळवी तत्स्वरूपी जीवा॥ १ ॥
    भूचरखेचर व्यापूनी योगी ह्र्त्कमली राहसी।
    तोचि दत्तगुरुदेव तू शिर्डी राहुनी पावसी॥
    राहुनी येथे अनत्रही तू भक्तास्तव धावसी
    निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसी।
    न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा॥ २ ॥
    सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिर्डी आले।।
    सोडुनिया दुरभिमान मानस त्वच्चरणी वाहिले।
    कृपा करुनिया साईमाऊले दास पदरी ध्यावा ॥ ३ ॥


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs