गदिमा नवनित
  • मरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा
    जरामरण यांतून कोण सुटला प्राणिजात?
    दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
मराठी युनिकोड फॉन्ट
अगदि आज (संगीत : नंदू घाणेकर) | Agadi Aaj (Music:Nandu Ghanekar)
  • गदिमांच्या लोकप्रिय गाण्यांना नव्या जनरेशनच्या ढिनच्याक गाण्यांच्या रुपात आणण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न,जून्या गाण्यांच्या चालींशी कुठलिही तुलना न करता एक वेगळा प्रयोग म्हणून नव्या जनरेशनला नक्कीच आवडेल.
    गदिमांचे मित्र व चित्रपट निर्माते गोविंदराव घाणेकर यांचे सुपुत्र नंदू घाणेकर यांनी हा वेगळा प्रयोग केला आहे,संगीत नंदू घाणेकरांचे आहे तर या गाण्यांचे संगीत संयोजन केले आहे आजचे आघाडीचे संगीतकार अजय-अतूल यांनी,गायक आहेत रविंद्र साठे,योगिता गोडबोले,अजय गोगावले.

    Agadiaaj Recording अगदि आज च्या ध्वनिमुद्रण प्रसंगी योगिता गोडबोले,अवधूत वाडकर,अजय गोगावले,नंदू घाणेकर,अशोक पत्की,अतूल गोगावले
  • Box-C-11
  • नखा नखावर रंग भरा गं
    Nakhan Nakhan War Rang Bhara

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: नंदू घाणेकर      Music Composer: Nandu Ghanekar
  • गायक: योगिता गोडबोले      Singer: Yogita Godbole
  • अल्बम: अगदि आज      Album: AagadiAaj





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)

  • चला सख्यांनो हलक्या हाते नखांनखांवर रंग भरा ग
    नखांनखांवर रंग भरा

    आज सावलीपरी जायचे त्यांच्यामागे पाऊल ग
    पायी पैंजण बांधा द्याया आगमनाची चाहुल ग
    सिंहकटीवर स्वैर खेळू द्या रत्‍नमेखला सैल जरा

    बाहुंवरती बांधा बाई बाहुभुषणे नागाची
    अंचलि झाका हृदयावरची कमळे ही अनुरागाची
    गळ्यात घाला हार साजिरा पदकी त्याच्या दिव्य हिरा

    वेणी गुंफा मदनबाण वर भवती हिरवा मरवा ग
    आकाशातिल नक्षत्रांसम माथी मोती जडवा ग
    सौभाग्याच्या नगरा नेते सौंदर्याचा थाट पुरा


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.ल.देशपांडे:
    महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs