गदिमांच्या आवाजात कविता,व्याख्यान | Poems & Speech Of Gadima
गदिमांच्या आवाजात त्यांच्या कविता व त्यांचे भाषण ऐकणे हा दुर्मिळ योग,जोगिया,जत्रेच्या रात्री व पूजास्थान या तीन कविता ऐका गदिमांच्याच आवाजात,तसेच पेण येणे गणेशोत्सव मंडळात गदिमांनी केलेले एक तासाचे दुर्मिळ भाषण मी कवी कसा झालो?,मराठी भाषा,आपली मराठी संस्कृती,संस्कार या पासून ते गदिमांच्यातला कवी कसा घडत गेला हे ऐका गदिमांच्या या सुंदर व्याख्यानातून.
गदिमांच्या पत्नि विद्याताई यांचा आवाज सुंदर होता,गदिमा-सुधीर फडके यांचे पहिले रेकॉर्ड झालेले गाणे विदयाताईंनी गायले होते.पुढे गदिमांसाठी त्यांनी आपल्या या गानकलेचा त्याग केला व गदिमांची गृहिणी-सखी-सचीव हीच भूमिका शेवटपर्यंत निभावली.गदिमा स्व:ता म्हणतात हे यश माझे नाही तूझे आहे,विदयाताईंच्या आवाजातले हे एक दुर्मिळ गाणे.
Box-C-7
वद यमुने कुठे असे घनःश्याम माझा - विद्याताई माडगूळकरांच्या आवाजात
Vad Yamune Kuthe Ase - Voice Of Vidyatai Madgulkar
MP3 player is mobile compatible (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
गदिमांच्या पत्नि विद्याताई माडगूळकर (पद्मा पाटणकर) यांच्या आवाजातील हे गाणे "वद यमुने कुठे असे घनःश्याम माझा"
गदिमा गौरव | Special Quotes
पु.ल.देशपांडे:
महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.