जोगिया हा गदिमांचा पहिला काव्यसंग्रह,प्रस्तावनेत गदिमा म्हणतात जीवनव्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेईमानी करण्याचा प्रसंग मजवर आला-येतो आहे.या संग्रहातील कविता ही मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे.या संग्रहाला जोगिया असे नाव म्हणूनच द्यावेसे वाटले.
गदिमांच्या जोगिया संग्रहातील निवडक १६ कवितांना चाली लावल्या आहेत सुरेशदा देवळे यांनी,गायक आहेत श्रीधर फडके,उत्तरा केळकर,रविंद्र साठे,चारुदत्त आफळे,ज्ञानदा परांजपे.गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी या अल्बमची निर्मिती केली आहे.
सावळी तरी तू गोर्याहुन गोमटी ग
पट्ट्यात चांदिच्या कशी बसविशी कटी ग?
थोराड हाड या मुलखाचे शेवटी ग
बुलंद दिसते तुझी इमारत,ठीक चिर्यावर चिरा
दिसे ही सातार्याची तर्हा
जाहली तुला ना चवदा वर्षे पुरी ग
पोवळी उमटली दोन्ही गालांवरी ग
इतक्यांत निघे कां मुरमांतुन बाजरी ग?
माहित नाही इष्क तुला पण भुइवरल्या पांखरा!
दिसे ही सातार्याची तर्हा
असतील ओठी तव अजुन उखाणे म्हणी ग
तुज कशी कळावी रंगाची लावणी ग
कां उगाच मिटते माझी मग पापणी ग
खरीच मोठी होशिल तेव्हा भेटच या शाहिरा
दिसे ही सातार्याची तर्हा
राहु दे तोवंरी असेंच निरसे हंसे ग
मी जपून ठेविन आंबट माझे पिसे ग
मंथनी पहा मग लोणी निघतें कसें ग
आवडिप्रीतिनें तूंच पसर त्या लोणआयावर शर्करा
दिसे ही सातार्याची तर्हा
गदिमा गौरव | Special Quotes
यशवंतराव चव्हाण
गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'