गदिमा नवनित
  • नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर,
    अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर.
मराठी युनिकोड फॉन्ट
  • सावरकर व विनोबांच्या साक्षीनं गीतरामायण.....
  • Geetramayan In front Of Vi Da Savarkar and Vinoba Bhave
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •   

    गीत रामायणाला स्वातंत्र्यवीर सावरकर उपस्थित राहण्याचा योग,पुण्यातल्या शिवाजी मंदिरातील कार्यक्रमाचे वेळी आला.
    लोडाला टेकून तात्या बसले होते. सर्व सभागृह मंत्रमुग्ध होत.

    "दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...."

    बाबूजी आपल्या स्वरांमधून

    शब्दामागचा अर्थ जिवंत करीत होते. कवि गायक यांना काही ज्ञात-अज्ञात प्रेरणा लागत असावी. त्याखेरीस शब्द-कल्पना जिवंत होत नसाव्यात. बाबूजींची प्रेरणा तर साक्षात त्यांच्यासमोरच आसनस्थ होता. शब्दनशब्द स्वरडोहात डूंबून ओला होऊन निघत. ६ वं कडवं संपलं. बाबूजी ७ व्या कडव्यापाशी आले.

    नको आसू ढाळू आता पूस लोचनास !
    तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास !
    अयोध्येत हो तू राजा,रंक मी वनीचा .....

    आणि काय सांगायचं ,तात्या सावरकरांची ती धीरगंभीर मूर्ती, तो निग्रही चेहरामोहरा जणू तेज विसरला. करुण झाला. ते गहिवरले. त्यांचा कठंमणी हलल्याचा भास झाला. बाबूजी म्हणतात की,मला स्वरांचं सामर्थ्य त्याक्षणि जाणवलं. तात्यांच्या नेत्रात अश्रू चमकले.मी धन्य झालो. सारे श्रम,सारे सायास,तपश्चर्या भरुन पावलो.

    -----------------------------------------------------------

    १९५८ सालच्या २ जूनची पहाट. मुक्काम पंढरपूर,सर्वोदय संमेलनानिमित्ताने विनोबांचा पंढरपूरात मुक्काम. फडक्यांनी त्यांना गीतरामायण ऐकवायचं ठरवलं.फडके-माडगूळकर पहाटेच्यावेळी विनोबांकडे गेले. गीतरामायण सुरु झाले.

    "गा बाळांनो श्रीरामायण"

    हे अखेरचे गीत भैरवी रागात आळवलं,तेव्हा विनोबांचे ह्रदय उचंबळून आलं आणि अखेरच्या कडव्यातील

    "काय धनाचे मुल्य,मुनिजना,अवघ्या आशा श्रीरामार्पण"

    या ओळी सुरु झाल्यावर तर विनोबांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रूच सुरु झाले.त्यांना बराचवेळ बोलवेनाच.विनोबांची ती स्थिती पाहून माडगूळकरही गहिंवरले.त्यांनी बाबांचे चरणी रामायणाची प्रत अर्पण केली.विनोबांनी मग वाल्मीकी आणि तुलसी रामायणाची वैशिष्टय माडगूळकरांना समजावून सांगितली.त्याच रात्री डाक बंगल्यात त्यावेळचे राष्ट्रपती राजेंन्द्र प्रसाद आणि राज्यपाल श्रीप्रकाश यांच्यासमोरही गीतरामायणाचा कार्यक्रम झाला.


गदिमा गौरव | Special Quotes
  • ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
    गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....
संबंधीत लेख | Related Articles