गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलुगु, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ठ्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात.
गीतरामायणाचे हे संस्कृत भाषांतर.भाषांतर केले आहे अंधेरी चे श्री.सीताराम दातार यांनी,तर गायन केले आहे मिलिंद करमरकर,माधुरी करमरकर,सुधा दातार यांनी.
या गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या, तोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.
गदिमा गौरव | Special Quotes
प्रा.रा.ग.जाधव
माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.